खंडाळा: महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मान्यतेने सातारा जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा यांच्या मागणीवरून खंडाळा तालुक्यातील मिरजे या गावातील रस्त्याचे डांबरीकरणासाठी निधी टाकला सदर कामाचे भूमिपूजन पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते आज 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले खंडाळा तालुक्याचे सर्वच प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत भेडसावणारा विजेच्या संदर्भातील प्रश्न सोडवण्यात आलेला आहे तसेच गुठाळे ते मिरजे या रस्त्याचे देखील लवकरच भूमिपूजन करण्यात येईल यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांनी देखील मनोगत व्यक्त केले,
यावेळी खंडाळा तालुकाप्रमुख भूषण शिंदे, माजी सरपंच अटीत निवृत्ती जाधव, माजी उपसरपंच पळशी एकनाथ बापू भरगुडे, मिरजे गावच्या सरपंच मनीषाताई सोनवणे, उपसरपंच समित कडाळे, विठ्ठल सोनवणे, सुनाबी पठाण, सारिका जाधव, सपना चव्हाण, राजू मांढरे हे मिरजे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच विश्वास सोनवणे, पिलाजी जाधव, शरद जाधव, प्रकाश जाधव, एडवोकेट बाळकृष्ण सोनवणे, विकास पाटील, भानुदास गरजे, अमोल जाधव, भानुदास शिरावळे, रवींद्र चव्हाण, गणेश पाटणे, सोमनाथ जाधव, पंढरीनाथ जाधव, आशुतोष सोनवणे, सौरभ सोनवणे, माजी सरपंच मिरजे रेश्मा मुजावर, शाखाप्रमुख व बूथ प्रमुख रमजान मुजावर यांच्या यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.