कापूरहोळ: राजगड पोलीस स्टेशन हद्दीमधील कापूरहोळ सासवड रस्त्यावरील दिवळे येथे कांदा विकत असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने गळ्यातील सोन्याची चेन पळवून नेण्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग दिनकर पांगारे हे कापूरहोळ सासवड रस्त्यावरील दिवळे येथे नेहमीप्रमाणे कांदा विकत बसले होते.एका दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने स्वतःला पोलीस असल्याचे सांगून दुकान का? उघडले आहे असे विचारले पांगारे यांनी त्या व्यक्तीला आयडी मागितली असता दुसऱ्या व्यक्तीने मागून येऊन पांगारे यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतली आणि कापूरहोळकडे पळून गेला.पांगारे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पकडले जाऊ शकले नाहीत.अंदाजे २ तोळ्यांची सोन्याची,, चेन हिसकावून नेण्यात आली आहे.
या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.