राष्ट्रीय महामार्ग प्राधिकनाच्या भोंगळ कारभारामुळे पुणे सातारा महामार्गावर तब्बल तीन तास वाहतूक कोंडी.
दत्तात्रय कोंडे|राजगड न्युज
खेड – शिवापूर (वार्ताहार) दि.27 :- पुणे – सातारा महामार्गावर ससेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत चार वाहनांचा मोठा अपघात झाला. तीन वाहने रस्त्यावर थांबली होती त्यातच रोडवरती पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने ठोकर दिल्याने यातील एक कार उड्डाणपुलावरून सर्विस रस्त्यावर कोसळली. यामध्ये तीन जण जखमी झाले असून एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
ससेवाडी ( ता. हवेली ) येथील हद्दीत पुणे सातारा महामार्गावरील उड्डाणपुलावर शनिवारी ( दि. २७ ) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समीर सुनील देसाई वय ३६ रा. सुकेची वाडी ( ता. भुदरगड. जि. कोल्हापूर ) असे जखमी असलेल्याचे नाव असून नसरापूर ( ता. भोर ) येथील सिद्धिविनायक रुग्णालयात त्यांना पोलिसांनी हलविले आहे. अपघातात ट्रकने एसटी बस, टेम्पो व कार यांना जोरदार धडक दिली.
पुणे सातारा रोड वरती अपघात झालेनंतर अपघातस्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने क्रेन लवकर पाठवली नाही. हा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन तब्बल तीन तासानी अपघातस्थळी पोहचली. यादरम्यान याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री एक टेम्पो दुभाजक तोडून खांबाला धडकला होता. या अपघातामुळे दुभाजकाचा पत्रा तूटून रस्त्यावर पडला होता. रस्त्यावर मोठा पत्रा आडवा पडल्याने सदर ठिकाणी एक एस टी बस, एक पिक अप, एक मोटारगाडी ही तीन वाहने थांबली होती. यादरम्यान पाठिमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने या तीन वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी या अपघातात मोटरगाडी उड्डाणपुलावरुन सेवा रस्त्यावर कोसळली. यावेळी मोटार गाडीतील तीन प्रवासी जखमी झाले तर एस टी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बस बचावली.
अपघात झाल्यानंतर अपघातातील जखमींना मदत करणे, रस्त्यावरील वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करणे, हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गस्त पथकाचे काम आहे. मात्र सदर ठिकाणी अपघातानंतर सुमारे तीन तास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन अपघातस्थळी पोहचली नाही. त्यामुळे खाजगी क्रेन लावून या अपघातातील वाहने बाजूला घेण्यात आली.
क्रेन ठेकेदाराचे बिल थकल्याने त्याने आज क्रेन अपघात स्थळी पाठवल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला इतर क्रेनची व्यवस्था करण्यास उशीर झाला.
बी. जे. शर्मा