भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोरला आज शनिवार दिनांक- ०९/१२/२०२३ ला झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये (अदालतीमध्ये) दिवाणी व फौजदारी ५४७ प्रलंबित प्रकरणे तर बॅंका,पतसंस्था, ग्रामपंचायती ,महावितरण, फायनान्स यांची १४६४ प्रलंबित थकित प्रकरणे अशी एकूण २०११ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दिवाणी व फौजदारी ६५ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड निवारण होऊन २७ लाख ९६ हजार ६६६ रुपयांची वसुली झाली . तसेच महावितरण, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पतसंस्था , ग्रामपंचायती व श्रीराम फायनान्स यांच्या ५८ प्रकरणांमध्ये तडजोड निवारण होऊन २० लाख ६८ हजार ३१३ इतक्या थकित रक्कमेची वसुली झाली अशी सर्व एकूण २०११ प्रकरणांपैकी १२३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण ४८ लाख ६४ हजार ९७९ रुपयांची वसुली झाली.
या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये पॅनल -१ मध्ये मुख्य पॅनल न्यायाधीश नेहा नागरगोजे ,पॅनल सदस्य ॲड अजिंक्य मुकादम व
पॅनल -२ मध्ये सह दिवाणी न्यायाधीश दिप्ती सरनायक ,पॅनल सदस्य ॲड.धिरज चव्हाण यांनी कामकाज पाहिले. सदर लोकअदालतीसाठी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड मयुर धुमाळ, उपाध्यक्ष ॲड बाळासाहेब गोगावले, सचिव ॲड राकेश कोंडे, खजिनदार ॲड श्रीमती अश्विनी कुलकर्णी टोले तसेच जेष्ठ ॲड शिवाजी मरळ, ॲड प्रकाश लाड, ॲड राजेंद्र खोपडे, ॲड विश्वनाथ रोमण, ॲड राजेशकुमार बारटक्के, ॲड दिपक बोरकर, ॲड उदय कोंढाळकर, ॲड दत्तात्रय उरुणकर, ॲड शिवाजी पांगारे, ॲड सुनिल बांदल, ॲड संजय काेचळे, ॲड विक्रम घोणे, ॲड अजिंक्य लाड, ॲड राजश्री बोरगे इतर सर्व वकील सदस्य, न्यायालयातील लिपिक इतर कर्मचारी व उपस्थित असलेल्या बँकांचे मॅनेजर, पतसंस्थाचे कर्मचारी, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, फायनान्स कंपनीचे मॅनेजर ,कर्मचारी व महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.